भुसावळ ([प्रतिनिधी) भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने दरोडा टाकण्यापूर्वीच सात कुविख्यात दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडील दोन गावठी पिस्टलासह चार जिवंत काडतूस, चॉपर, चार तलवारी जप्त केल्या आहेत.
अटकेतील आरोपींमध्ये मध्यप्रदेशातील खंडवासह फैजपूर, भुसावळ येथील संशयितांचा समावेश आसहे. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून शहरात येणार्या प्रमुख रस्त्यांवर संशयास्पद वाटणार्या वाहनांची तपासणी केली जात आहे. रविवारी मध्यरात्री बाजारपेठ पोलिस महामार्गावर गस्त करीत असतांना त्यांना सात संशयित दिसल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पथकाने पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव व सहकार्यांनी ही कारवाई केली.