चित्रकुट (वृत्तसंस्था) कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे मठाधीश शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री उशीरा कर्नाटक पोलिसांनी अटक केली.
शिवामूर्ती मुरघा शरानारूच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्यावर अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असून वैदयकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिस आज पुन्हा खुल्या न्यायालयात त्यांच्या रिमांडची मागणी करणार आहेत. तूर्त शिवमूर्ती यांची चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात एससी एसटी कायद्याचेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. कर्नाटकचे एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) आलोक कुमार यांनी बीबीसीला बोलताना सांगितले की, डॉक्टर शिवमूर्ती यांना कोर्टापुढे सीआरपीसी कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवल्यानंतर अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी रश्मी नामक आरोपी क्रमांक 2, ज्या की मठाच्या वसतीगृहाच्या वॉर्डन आहेत, त्यांच्याशीही अनेक तास चौकशी केली. त्यानंतर शिवमूर्ती यांना बेड्या ठोकण्यात आल्या.