मुंबई (वृत्तसंस्था) कल्याणमध्ये प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने नातेवाईक असलेल्या अल्पवयीन भाऊ-बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला असून, अल्पवयीन भावा बहिणीची व्यथा ऐकून पोलिसदेखील हैराण झाले आहेत. 14 वर्षीय मुलावर एक 23 वर्षीय तरुणी सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होती. विशेष म्हणजे सदरील प्रकरणातील तरुणी पिडीत मुलाची नातेवाईक असल्याचे समजते. एवढेच नव्हे तर, या आरोपी तरुणीने तिच्या प्रियकराला मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. तो प्रियकर त्या अल्पवयीन मुलीसोबत तर ती मुलगी त्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करीत होती. या आरोपी तरुणीने मुलाच्या बहिणीला सांगितले की, आपण दोघे मिळून तिच्या प्रियकरासोबत शय्या करायची. दरम्यान, दोन्ही पिडीत भावा बहिणीने घरच्यांना सदरील प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.