नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट होणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सहकार आणि राज्यातील काही प्रश्नांसंदर्भात ही भेट घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सहकार मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर पवार आणि शाह यांची ही पहिलीच भेट आहे. दुपारी दोन वाजता शरद पवार आणि अमित शाह यांची भेट होणार आहे. सहकार क्षेत्राशी संबंधित प्रश्नाबद्दल पवार शाह यांची भेट घेणार असल्याचं समजतं.