जळगाव (प्रतिनिधी) जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो युनीट येथे पोलीस उप अधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव युनीटकडील अतिरीक्त कार्यभार असलेले पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांचेकडील अँन्टी करप्शन ब्युरो युनीटचा पदभार पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाटील यांनी दि. २३ जुलै २०२१ रोजी स्वीकारला आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक, शशीकांत पाटील यांनी केले आहे.