जळगाव (प्रतिनिधी) शतपावली करीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातून ६० हजारांचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना हिरा पाईपरोडवरील मातृभूमी चौकात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जूना नशिराबाद रोडवरील सदोबा नगरात शितल दर्शन पाटील (वय ३२) या वास्तव्यास आहे. दि. २२ रोजी रात्री त्या जेवण झाल्यानंतर घराजवळील हिरा पाईप रोड परिसरात शतपावली जळगाव : शतपावली करीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने शितल दर्शन पाटील (वय ३२, रा. सदोबानगर, जूना नशिराबाद रोड) यांच्या गळ्यातून ६० हजारांचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना दि. २२ रोजी रात्री ९ वाजच्या सुमारास हिरा पाईपरोडवरील मातृभूमी चौकात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जूना नशिराबाद रोडवरील सदोबा नगरात शितल दर्शन पाटील या वास्तव्यास आहे. दि. २२ रोजी रात्री त्या जेवण झाल्यानंतर घराजवळील हिरा पाईप रोड परिसरात शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रस्त्याने चालत असतांना दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातून ८ ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेले. चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढल्यानंतर सुमारे दीड ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रातील वाटी ही घटनास्थळी मिळून आली. याप्रकरणी सोमवारी शितल पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.