TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्कॉर्पियो गाडीमागे दिसलेली ‘ती’ इनोव्हा NIA कडून जप्त, इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनाच या प्रकरणात अटक केली. यानंतर आता स्कॉर्पिओ कारबरोबर दिसलेली इनोव्हा कारही सापडली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार मुंबई पोलिसांचीच असल्याचं समोर आलं आहे.

मुकेश अंबानी प्रकरणाला रविवारी वेगळेच वळण मिळालं. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)च्या पथकाच्या हाती मोठे यश आले आहे. एनआयएच्या पथकाने अँटीलियाबाहेर दिसलेल्या इनोव्हा गाडीला शनिवारी रात्री शोधले आहे. क्राइम ब्रांचमध्ये असताना सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी हीच कार वापरत होते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी (२५ फेब्रवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून (ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होतं. दरम्यान ही इनोव्हा कार सापडली असून, शनिवारी रात्री एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली.

स्कॉर्पिओ गाडीबरोबर एक इनोव्हा कार होती. ज्यातून स्कॉर्पिओ गाडीचा चालक फरार झाला होता. मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावर या गाडीत दोन व्यक्ती दिसून आले होते. स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याचं समोर आलं होतं. तर इनोव्हा कारच्या मालकाचा शोध घेतला जात होता. मात्र, आता ही कार सापडली असून, मुंबई पोलीस गुन्हे शाखेचीच ही गाडी असल्याचं समोर आलं आहे. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांकडून पांढऱ्या इनोव्हाबद्दल माहिती काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. इनोव्हाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. त्याचबरोबर ३० पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले होते. तरीही पांढऱ्या इनोव्हाबद्दल कोणतीही माहिती मिळाली नव्हती.

सचिन वाझेंचा अजून एक व्हिडिओ व्हायरल

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका स्कॉर्पियो कारजवळ दिसत आहेत. ही कार हूबेहूब अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार सारखी आहे. महाराष्ट्र ATS आता या व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरचा आहे, जेव्हा वाझे हे पोलिस पथकासह पत्रकार अर्णब गोस्वामीला अटक करत होते. यावेळी, रिपब्लिक टीव्हीच्या टीमने त्यांचा पाठलाग केला, त्यानंतर त्यांनी ताफा थांबवला. त्यावेळी तीच संशयास्पद कार त्याच्या जवळ उभी असल्याचे दिसून येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नवीन बियर बार व परमिटचा परवानासाठी अप्रत्यक्ष पैशाची मागणी ; राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी !

January 10, 2023

जाणून घ्या… जिल्ह्यात अनलॉकचे नवीन नियम !

August 13, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १४ ऑगस्ट २०२३ !

August 14, 2023

ब्रेकिंग न्यूज : बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ; न्यायालयाने विरोधातील याचिका फेटाळली ; ठाकरे सरकारला मोठा दिलासा !

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group