बोदवड (महेंद्र पाटील) तालुक्यातील शेलवड हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून नाटकांची परंपरा जोपासत आहे. गावात दोन नाटक मंडळ असून गणपती व दसरा सणांच्या निमित्ताने गावात नाटक सादर केली जातात. त्या पैकी गणेशोत्सवा निमित्ताने ६८ वर्षांपासून हे नाट्यवेड जपणारे सन १९५४ पासून नाटकांचे प्रयोग करणारे श्री गजानन संगीत नाटक मंडळ आहे.
दोन वर्षे कोविड मुळे बंद नाट्य प्रयोग या वर्षी उत्साहात तीन दिवसीय नाट्य श्रुंखलाद्वारे सादर झाली व तीन नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. गणेश चतुर्थीला गणेश पूजन होते. एकादशी, द्वादशी, आणि त्रयोदशीला तीन दिवस नाटक सादर केले जातात. कलावंत गावातीलच असतात. स्वखर्च व गावातून मिळणारी ऐच्छिक वर्गणी यातून नाटकाचे नियोजन केले जाते. स्त्री पात्र पुरुष कलाकार रंगवत अजूनही काहीश्या जुन्याच पद्धतीने सादरीकरण होत असलेल्या या प्रयोगात या वर्षी ‘गाव ईनामी, सरपंच खुनी’ ‘शोधू कुठे किनारा’ आणि ‘हे दान उपकाराचे’ या नाटकाचे प्रयोग गावकऱ्यांच्या उत्साही प्रतिसादात सादर झाले.
या वर्षी दिग्दर्शक – बाबुराव बोरसे, सहदिग्दर्शक- कैलास बावस्कर,एकनाथ काजळे, भागवत पवार, वासुदेव शंकर माळी,ईश्वर जवरे,संगीत – राजेंद्र माळी आणि शामभाऊ बोदडे यांचे तर यातील कलाकार म्हणून दिलीप बुलाखी, राकेश बोरसे, योगेश बावस्कर, अमोल गायकवाड, योगेश सोननी, अमोल सोनवणे, योगेश बोरसे, विलास बावस्कर ,जयंत साळुंखे, सौरव बोदडे, विकास बावस्कर, संतोष चवरे, सतीश सोनवणे ,वासुदेव बावस्कर म्हणून सहभागी आहेत.तसेच अध्यक्ष रवींद्र जवरे,रामदास दामू माळी, आनंदा साळुंखे,रवींद्र सुकाळे यांचे सहकार्य होते.