भुसावळ प्रतिनिधी । शहराचा नुकताच पदभार पोलीस उपविभागीत अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांभाळला असून भुसावळ तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम पोलीस व पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने त्यांची प्रथम पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यानंतर भुसावळातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शिर्डी पॅटन वापरणार असल्याची माहिती डी.वाय.एस.पी. सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यामध्ये आपला व पत्रकारांचा परिचय करून शहरातील समस्था पत्रकाराकडून जाणून घेतल्या.पदभार सांभाळल्यानंतर भुसावळ शहरात क्राईम मोठया प्रमाणात आहे. यासाठी लवकरच सर्व गुन्हेगारांचा डाटा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये एकापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्यांची फोटो व गुन्हे संबंधित सर्व यादी तयार करण्यात येणार आहे.तसेच तिसरा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांवर तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.यासाठी भुसावळातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शिर्डी पॅटन वापरणार असल्याची माहिती डी.वाय.एस.पी. सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
भुसावळ शहरातील सर्वात मोठी अडचण रस्त्यावरील वाहतुकीची आहे.रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण धारकांना हातगाड्या उभ्या करून रहदारीस अडथळा निर्माण करीत असल्याने अपघातांच्या प्रमाणत वाढ होण्याची शक्यता आहे.ते सर्व अतिक्रमण डांबरी रस्त्यावरील आज संध्याकाळी काढण्यात सुरुवात केली जाणार आहे.बाकी अतिक्रम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारींची भेट घेऊन त्यांच्या काढण्याच्या दुचनाबदेण्यात येणार आहे.रस्त्यांवर जमाव करून तसेच रात्रीच्या वेळेस कट्ट्यावर बसलेल्यांवर पायी पेट्रेलियम करून कारवाई केली जाणार आहे तर रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात येणार आहे.नवदुर्गा 210 मंडळांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.यामध्ये आरतीला पाच जणांच्या वर कुठलेही कार्यकर्ते नको.
गरबा, दांडिया,डीजे विसर्जन करतांना कोठलेही वादय वाजविले जाणार नाही.यासर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.तसेच या मंडळांचे पुढील परवानगी रद्द करण्यात येणार आहे. मा. जिल्ह्याधिकारी याचे आदेशावरून जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.तसेच जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने पोलीस दत्तक योजना सुरू करण्यात आली असून रेकॉर्ड वरील गुन्हेगार,हिस्ट्रीसीटर यांच्यावर बारकारीने लक्ष ठेवण्यात येणार आहे.तसेच अवैध कट्टे बाळगणाऱ्याव तसेच संघटित गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यासाठी मोका कारवाईत वाढ करण्यासाठी कोर्टातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली आहे.तसेच बाल गुन्हेगारांच्या कुटूंबियाची भेट घेऊन बाल गुन्हेगारी कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत व गोपनीय विभागाचे पोना.नंदकिशोर सोनवणे उपस्थित होते.