धरणगाव (प्रतिनिधी) दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे सर्व संशयित आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत. त्यांच्याकडून बोलेरो, कुऱ्हाड, लोखंडी सळई, असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांचा पथकाला पाळधी ते सावदा प्रचा शिवारात गावाचे अलीकडे संप्तशिंगी मातेच्या मंदीराजवळ महेंद्र बुलेरो गाडी क्र. (MP- ४६-G-११४७) हिच्यात दरोडा घालण्याचा साहित्यासह दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असलेले काही जण आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले असता
गाडीमध्ये चीनमध्ये एक लोखंडी कु-हाड लोखंडी सळई सुताचा दोर असे साहित्य मिळून आले. त्यानंतर सदर पाच तरुणाची अंगझडती घेतली असता एकाच्या कमरेला एक धारदार पाते असलेला चाकू मिळून आला. तसेच दुसऱ्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात प्लॅस्टीक पिशवीत लाल मिरचीची पावडर व कमरेला पेन्चीस मिळून आली. तर वाहनातील पाचही जणांची चौकशी केली असता, त्यांनी त्यांची ओळख अनिल लासग भिल (वय २१ वर्ष रा. मोहाला पोस्ट- चापोरा ता. सेंधवा जि. बडवाणी),नानुसिंग रूपसिंग बारेला (वय २५ वर्ष रा. रजानेमल ता. सेंधवा जि.बडवाणी चापोरा ता. सेंधवा, जानमन रुमालसिंग बारेला (वय-२२ वर्ष रा. मोहाला पोस्ट-जि. बडवाणी), भाईदास पातलिया भिलाला (वय- २९ वर्ष रा. दिली ता. संधवा जि. बडवाणी, हत्तर गनदा चव्हाण (भिलाला) वय-२२ वर्ष, रा. हिंदली ता. सेंधवा जि. बडवाणी, अशी ओळख सांगितली. पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सपोनि सचिन शिरसाठ हे करीत आहेत.
















