TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसैनिक सुसाट, ईडी कार्यालयासमोर ‘भाजप प्रदेश कार्यालयाचे’ शिवसैनिकांनी बोर्ड लावले

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसैनिक अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले. संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा घणाघात केला आहे.

शिवसैनिकांनी मुंबईतील ईडी कार्यालयासमोरच “भाजप प्रदेश कार्यालय” म्हणून बँनर लावले आहेत. सेना भवनसमोर महिला शिवसैनिकांची ईडी व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एकीकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर बॅनरबाजी केली… ईडी कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असं पोस्टर लावून शिवसेनेनं कृतीतून भाजप तसंच ईडीला टोला हाणला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे. ‘ईडीच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. गेल्या वर्षभरापासून आपल्यावर सरकार पाडण्यासाठी सातत्याने आपल्याला धमकावलं जात असल्याचा’ गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ‘ईडीच्या कार्यालयात गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे काही नेते सतत जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या २२ आमदारांची यादी आपल्याला दाखवण्यात आली. या २२ जणांना नोटीसा पाठवून नंतर अटकेची टांगती तलवार ठेऊन राजीनामे घेण्याचा कट रचला जात आहे.’ असा आरोप त्यांनी केला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

‘ईडीचा गेल्या महिन्याभरापासून आपल्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रं त्यांना आपण दिली पण हा संदर्भ त्यांनी सांगितला नाही, मग हे पीएमसी बँकेसंदर्भात आहे हे भाजपच्या माकडांना कसं समजलं.’ असा सवाल त्यांनी केलाय. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, आम्ही लॉ मेकर आहोत, मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, तुमची संपत्तीचे आकडे माझ्याकडे, तुमच्या मुलांचे हिशेब माझ्याकडे, मात्र उद्धव साहेबांचा आदेश, बाळासाहेबांची शिकवण, कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही, लढाई समोरासमोर करायची. ईडीच्या नोटीचा आदर करतो, भले तो भाजपचा पोपट असो, असा टोलाही राऊतांनी लगावला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी देवांग काटे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन तरुणाच्या अत्याचारातून १९ वर्षीय तरुणी गर्भवती ; यावल पोलिसात गुन्हा !

October 2, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ६ झाले बरे !

October 30, 2021

करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात निघाली भव्य मशाल रॅली !

May 10, 2024

रीतू मंडोरेला सुवर्णपदक !

March 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group