धरणगाव (प्रतिनिधी) शहरात मागील दोन दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा सुरु आहे. शहरात फिल्टर प्लँट असून अशुद्ध पाणीपुरवठा कसा होतो?, याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेत पालिका प्रशासन धारेवर धरले.
यावेळी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मोठा माळी वाडा परिसरातील स्वच्छता गृह तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. जेणेकरून नागरिक उघड्यावर शौचास बसण्याची गरज भासू नाही. श्री.वाघ यांनी नवीन स्वच्छता गृहचे काम पूर्ण झाले आहे, तरी त्याला कुलूप का लावले? असा प्रश्न विचारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला फोन केला असता लोकार्पणचे कारण सांगितले. परंतु श्री. वाघ यांनी लोकांच्या सहनशीलता अंत झाला आहे. नागरिकांची सोयी महत्त्वाचे आहे, असे सांगत लोकार्पण दोन दिवसात कुलूप खोलून करा नाही तर, आम्ही खोलु अस दम दिला.
पाणीपुरवठा अभियंता यांनी हातनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ येत आहे. फिल्टर होण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यावर उपाय करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शहरातील विविध समस्यांवर देखील चर्चा झाली. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरसेवक अहेमद पठाण, संघटक धिरेंद्र पुरभे , लष्मण माळी, उपशहर प्रमुख रवि जाधव , कमलेश बोरसे, नागराज पाटील, राहुल रोकडे, विनोद रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर नपाचे प्रशासकीय अधिकारी संजय मिसर, बांधकाम अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा चव्हाण, किशोर खैरनार, आरोग्यचे निलेश वाणी महेश चौधरी हे देखील उपस्थित होते.