मुंबई (वृत्तसंस्था) एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यातील शिवसेनेला हा दुसरा धक्का बसला आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. NSEL घोटाळ्याप्रकरणी ईडी (ED) तपास करत होती. या प्रकरणात ईडीकडून प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्याचाही ईडीने प्रयत्न केला होता. त्यांना अनेक समन्सही पाठवण्यात आले होते. याच प्रकरणात ईडीने प्रताप सरनाईक यांची ठाण्यातील ११.३५ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. सन 2013 मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचे समोर आले. जवळपास 13000 गुंतवणूकदारांच्या 5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.