अमरावती (वृत्तसंस्था) विधान परिषद निवडणुकीच्या (Election) दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, आमदार नितीन देखमुख गुवाहटीवरून आता अमरावतीमध्ये परतले आहेत. आमदार देशमुख अमरावतीत परतल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदारांनी परत यावं, असं आवाहन आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदेसहित शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्याने पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे दोन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून परतले आहेत. बाळापूरचे आमदार नितीन देखमुख आता अमरावतीत आले आहेत. यावेळी अमरावतीच्या शिवसैनिकांनी आमदार देशमुख यांच्या समर्थनार्थ अमरावतीच्या शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
अमरावतीत आमदार देशमुख परतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आमदार देशमुख म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे की, मी त्यांच्या पाठीशी आहे’. पुढे त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदारांनी परत यावं असं आवाहन आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना जनता मतदारसंघात जागा दाखवणार अशी तीव्र प्रतिक्रिया देखील आमदार देशमुख यांनी दिली.