जळगाव (प्रतिनिधी) शिवाजीनगरमधील पुष्पांजली कॉलनीमध्ये रोड व गटारीच्या समस्या खूपच बिकट झाल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांना दोन दिवसापूर्वी समस्या दाखवल्या होत्या. याची दखल घेत त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून आज सूचना दिल्या आहेत.
शिवाजीनगरमधील पुष्पांजली कॉलनीमध्ये रोड व गटारीच्या समस्या खूपच बिकट झाल्या होत्या. लोकांना गणेश उत्सव देखील साजरा करता आला नाही व गाडी नाही तर पाई सुद्धा चालता येत नव्हते व कोणी लक्ष द्यायला सुद्धा तयार नव्हते. त्या सर्व गोष्टी नागरिकांना खूपच त्रासदायक होत होत्या. तसेच कॉलनीतील सर्व नागरिकांनी मिळून शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांना बोलून दोन दिवसापूर्वी समस्या दाखवल्या होत्या. याची दखल घेत शिवाजीनगर भागातील विभाग प्रमुख विजय बांदल यांनी त्यांच्या वरिष्ठांना सूचना देऊन व अधिकाऱ्यांना कॉलनीमध्ये बोलून जळगाव शहर अभियंता भोसले तसेच शिवाजीनगर विभागातील इंजिनीयर संजय पाटील, आरोग्य साफसफाई अधिकारी अजय चांगरे, प्रमोद परदेशी, पाटील या सर्वांना परिसरातील समस्या दाखविल्या. यावेळी कॉलनीमधील सर्व रहिवाश्यांनी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांचे आभार मानले.
यावेळी लाला सणस, एकनाथ पिसाळ, अमोल माळी, लखन भुतकर, संदीप धनगर, किरण ठाकूर, अमोल डाबोरे, विशाल भदाणे, रोहित पाटील, विशाल बाविस्कर, प्रशांत फरसें, चंपालाल लोहार, राजू लोहार, राहुल इंगोले, संदिप भुईकर, ललित सोनवणे, कैलास पिंपळे आदी उपस्थित होते.