चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकार करीत असलेल्या गैर प्रकाराचा निषेध म्हणून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला. तसेच यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली भारतीय लोकांना भावनिक आव्हान करून त्या नावाने करोडो रुपये निधी जमा करून त्याचा गैरवापर करून निधी राजभवनात न जमा करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरणाऱ्या किरीट सोमय्या याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा तसेच शिवसेनेचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आकस बुद्धीने खोटेनाटे आरोप करून ईडी या तपास यंत्रणेचा बाहुल्या सारखा वापर करून केंद्र सरकार करीत असलेल्या गैर प्रकाराचा निषेध म्हणून आज चाळीसगाव शिवसेनेच्या वतीने स्वरूपाचे आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी किरीट सोमय्या यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी चाळीसगाव शहर व तालुक्यातील शिवसेनेचे शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.