भुसावळ (प्रतिनिधी) अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन महावकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ३१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम फेरी ऑनलाईन घेण्यात आली होती. अंतिम फेरी बक्षीस वितरणा पूर्वी घेण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे पाचवे वर्ष होते. पाच गटातील २० विजेत्यासह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना रविवारी (दिनांक ६) गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, ताप्ती एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मोहन फालक, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन जळगावचे अजय बढे, प्रा.डॉ.भाग्यश्री भंगाळे, रेल्वे स्कुलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेतील पाच गटातील प्रत्येकी १२ विद्यार्थी यानुसार ६० विद्यार्थ्यांची अंतिम फेरी नहाटा महाविद्यालय लायब्ररी हॉल येथे रविवारी पार पडली.परीक्षक म्हणून सतीश कुलकर्णी, आनंदा सपकाळे, श्रीकांत जोशी, नाना पाटील, सुनील पाठक, संध्या भोळे,दिनकर जावळे, दीपक कुलकर्णी, मीरा जंगले, संध्या महाजन, रीता शर्मा, गणेश जावळे, शैलेन्द्र वासकर,ज्योती लिलाधर राणे, अतुल इंगळे, अमित कुमार पाटील, श्रीश चिपळोणकर, जयश्री काळवीट, विक्रांत चौधरी, दुर्गादास पाटील, ज्ञानेश्वर घुले, ज्योती चौधरी, विजय सिंग पाटील, पंकज पाटील, ऋषिकेश पवार, हेमांगिनी चौधरी,भास्कर जाधव यांनी काम पाहिले.
अंतिम फेरी झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख जीवन महाजन यांनी केले.शिक्षण आणि सामाजीक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल ज्ञानेश्वर घुले आणि डॉ.संजू भटकर यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला.क्रान्ती सुरवाडे, ज्योती वानखेडे, यश माखिया, विलास निकम यांचा विध्यार्थ्यांना प्रेरित केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. समर्थ पाटील या विध्यार्थ्यांच्या पोवाड्याने कार्यक्रमास सुरवात झाली, त्यानंतर स्पर्धेच्या ३२ परिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी तर आभार स्पर्धा सह समन्वयक वंदना भिरूड यांनी मानले.सन्मानपत्राचे वाचन प्रकल्प समन्वयक शैलेंद्र महाजन यांनी केले.यशस्वीतेसाठी राजेंद्र जावळे, प्रदीप सोनवणे, प्रा.श्याम दुसाने, समाधान जाधव, राजू वारके, अमित चौधरी, सचिन पाटील, भूषण झोपे, मंगेश भावे आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते
पहिला गट (इयत्ता 1ली , 2 री)
प्रथम स्तव्य कमलेश शामकुवर (पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावल), द्वितीय ऋतुजा मनोज सरोद (जि प शाळा लोहारा तालुका, पाचोरा), तृतीय वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील (गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यामंदिर, जळगाव), उत्तेजनार्थ – हिंदवी सुनील पाटील (बालाजी प्राथमिक विद्यामंदिर, पारोळा)
द्वितीय गट (इयत्ता 3 री, 4 थी)
प्रथम विधी गजानन किनगे (काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव), द्वितीय यशश्री सुधाकर सपकाळे (जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ), तृतीय अवंतिका योगेश पाटील (सेंट अलॉयसियस कॉन्व्हेंट हायस्कूल, भुसावळ),उत्तेजनार्थ – निरंजन जितेंद्र सोनवणे (भाऊसाहेब काशिनाथ लाठी शाळा, जळगाव)
तृतीय गट (इयत्ता 5 वी ते 8 वी)
प्रथम गायत्री शिवाजी ठाकूर (गो से हायस्कूल, पाचोरा),द्वितीय हंसिका नरेंद्र महाले(सेंट अलोयसिस कॉन्व्हेंट हायस्कुल, भुसावळ ), तृतीय निधी राकेश मुंडके ( ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ), उत्तेजनार्थ – चंदन पुरुषोत्तम पाटील (जिल्हा परिषद शाळा, टहाकळी ता-भुसावळ)
चतुर्थ गट (इयत्ता 9 वी ते 12 वी)
प्रथम कोमल चंद्रकांत शिरसाळे (दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यामंदिर, सुनसगाव ),द्वितीय प्रथमेश निलेश पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर),तृतीय पायल गजानन थोरात (ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव),उत्तेजनार्थ -अश्विनी गोपाळ पाटील (दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालय, सुनसगाव)
पाचवा गट (खुला गट)
प्रथम कल्याणी संजय अहिरे (जी जी खडसे कॉलेज, मुक्ताईनगर), द्वितीय गजानन काशिनाथ इंगळे ( भुसावळ ) तृतीय रवींद्र प्रकाश पाटील(उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा, बोरावल,ता.यावल), उत्तेजनार्थ – आकांक्षा समाधान जाधव (भुसावळ)