TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ शहरात 2 ऑगस्ट रोजी ‘नवरत्नां’चा सन्मान

अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना ‘विशेष सेवा गौरव’ पुरस्कार जाहीर

vijay waghmare by vijay waghmare
July 27, 2025
in भुसावळ, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (27 जुलै 2025) ः उत्तर महाराष्ट्रातील ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीदवाक्य घेवून कार्यरत ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या वेब न्यूज पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवार, 2 ऑगस्ट 2025 रोजी शेकडो वाचक व भुसावळसह जिल्ह्यातील लाडक्या लोकप्रतिनिधी व प्रमुख शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. वर्धापनदिनानिमित्त यंदापासून ‘नवरत्नांचा सन्मान’ व ‘विशेष सेवा गौरव’ तसेच ‘भुसावळ भूषण गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.

‘यांना जाहीर झाला नवरत्न समर्पण सेवा गौरव पुरस्कार 2025’
भुसावळ शहरातील विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे आपले कार्य करणार्‍या नवरत्नांची नवरत्न समर्पण सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात आरोग्य- प्रवीण फालक, सामाजिक- सोनू मांडे, वैद्यकीय- डॉ.सांतनूकुमार साहू, महिला सबलीकरण- रजनी सावकारे, नाट्य (सांस्कृतिक) प्रेरणा देशमुख, भाषा अभ्यासक- प्र.ह.दलाल, महिला समुपदेशन- भारती रंधे-म्हस्के, शैक्षणिक- प्राचार्य अनघा पाटील, सांस्कृतिक- गणेश फेगडे यांचा समावेश आहे.

READ ALSO

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

‘विशेष सेवा गौरव सन्मान’
भुसावळ शहर व विभागाची धूरा सांभाळताना अल्पावधीत आपल्या कार्याने सर्वांना आपलेसे करून सोडणार्‍या व शहरवासीयांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक व आता श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच तत्कालीन उपअधीक्षक व आता पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपायुक्त असलेल्या कृष्णात पिंगळे यांचा विशेष सेवा गौरव सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.

‘भुसावळ भूषण पुरस्कार’
भुसावळसारख्या कॉस्मोपॉलिटीन शहरातील एम.आय.तेली इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी नूर फातेमा मणियारचा निबंध लेखन स्पर्धेत राज्यातून प्रथम आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी अलीकडेच सन्मान केला. या विद्यार्थिनीच्या कार्याची दखल घेत तसेच बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटींगमध्ये गोल्ड मेडल पटकावणार्‍या तीर्थराज मंगेश पाटील (भुसावळ) व बालभारती अभ्यास मंडळावर निवड झालेल्या तसेच राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.जगदीश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते भुसावळ भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

या मान्यवरांची ‘वर्धापनदिन विशेषांक’ प्रकाशनासाठी उपस्थिती
या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अमळनेरच्या खासदार स्मिताताई वाघ, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेरचे आमदार अमोल जावळे, भुसावळातील ताप्ती एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, ताप्तीचे चेअरमन महेश फालक, भारतीय महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, जळगाव लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील, सक्षम कौन्सीलिंग सेंटरच्या मॅनेजिंग डायरेक्टर आरती चौधरी यांच्यासह जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी आदींची उपस्थिती राहणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यास खान्देशातील वाचकप्रेमींनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन संपादक अमोल देवरे व कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

धरणगाव नगरपरिषदेची हरित क्रांती – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रोपवाटिका व बीज संकलन केंद्राचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात सेवापुर्ती सोहळा उत्साहात

October 1, 2020

कोविड सेंटरमधील रुग्णांशी खासदार रक्षा खडसेंनी साधला संवाद ; वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

May 5, 2021

आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी

April 23, 2021

पालकमंत्र्यांचे दातृत्‍व…स्‍वबळावर उभे राहण्यासाठी अपंग तरुणाला व्यवसायासाठी आर्थिक मदत !

January 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group