TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला- अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचे आदेश

vijay waghmare by vijay waghmare
October 13, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) – दुष्काळी परिस्थितीत राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १ हजार नवीन वितरण रोहित्र व ‘स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर’ तसेच ‘कॅपॅसिटर बॅँक’ खरेदीसाठी जिल्हानिहाय २० कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. या सर्व कामांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सोमवारी (दि. १२) सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला आणि ही सर्व कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
मुंबई येथील ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आयोजित बैठकीमध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके बुधवार (दि. १४) पर्यंत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले. या निधीमधून होणाऱ्या वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही तसेच नादुरुस्त किंवा बंद पडलेले रोहित्र तातडीने बदलण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संचालक श्री. धनंजय औंढेकर (संचालन), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. सचिन तालेवार (प्रकल्प), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह कार्यकारी संचालक तसेच सर्व क्षेत्रीय मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंते उपस्थित होते.
मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने कृषिपंपांना आणि कृषी वीजवाहिन्यांवरील घरगुती ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी प्रत्येक जिल्हयासाठी २० कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून आवश्यकतेनुसार विद्यमान ६३ केव्हीएऐवजी १०० केव्हीए क्षमतेचे तसेच अतिरिक्त सिंगल पोल रोहित्र उभारण्यात येणार आहे. यासोबतच कृषी वाहिनीवरील घरगुती ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ‘स्पेशल डिझाईन रोहित्रे’ (एसडीटी) बसविण्यात येणार आहेत. तर योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी उपकेंद्रांमध्ये आणि वीजवाहिन्यांवर आवश्यकतेनुसार नवीन कपॅसिटर बँक्स बसविण्यात येणार आहेत.
विशेष निधीमधील सर्व प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके संबंधित अधीक्षक अभियंत्यांनी दि. १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करावेत. दुष्काळी परिस्थितीत रोहित्र बिघाड व इतर तातडीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी २४ तास सुरु असणारी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.
राज्य शासनाच्या विशेष निधीमधून केवळ कृषीपंपांचा आणि कृषी वाहिन्यांवरील घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सक्षम करण्यासाठीच कामे प्रस्तावित करावीत. या निधीचा अन्यत्र वापर करू नये असे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी स्पष्ट केले. चालू रब्बी हंगामातच शेतकऱ्यांना सुरळीत व दर्जेदार वीज मिळेल यासाठी ही कामे निर्धारित गुणवत्ता व तांत्रिक मानकांचे तंतोतंत पालन करून वेळेत पूर्ण करा असे निर्देश त्यांनी दिले. याबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक क्षेत्रीय कार्यालयांना यापूर्वीच निर्गमित करण्यात आल्याचे संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahavitaran in ‘Mission Mode’ across every district to ensure uninterrupted power supply for agricultural pumps

Related Posts

गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा निर्णय, भाई जगताप यांची अध्यक्षपदी निवड

December 19, 2020

गोरजाबाई जिमखाना अध्यक्षपदी गुरुमुख जगवाणी यांची बिनविरोध निवड

February 7, 2021

धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथे विविध कामांचे भूमिपूजन,उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा !

March 23, 2023

जळगावात युवक बिरादरी व बाॅक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनतर्फे मोफत वृत्तपत्र वाचनालय

September 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group