TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : शासकीय कोविड सेंटरमधून १५ रुग्ण पळालेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पळासखेडा येथील धारिवाल पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शासकीय कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सद्यस्थितीत या कोविड सेंटरमध्ये ५० बाधित रुग्ण दाखल आहेत. मात्र, या सेंटरमध्ये रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ५० पैकी १५ रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढता पाय घेतला आहे.

या सेंटरमध्ये रुग्णांना वेळेवर चहा-नाष्टा, जेवण मिळत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट असतो. पिण्यासाठी पाणी देखील वेळेवर मिळत नाही. सोयीसुविधा चांगल्या मिळाव्यात म्हणून रुग्णांनी अनेकदा आरोग्य यंत्रणेकडे तक्रारी केल्या. परंतु, तक्रारींची दाखल घेतली जात नसल्याने रुग्ण चांगलेच संतप्त झाले. ५० पैकी १५ रुग्णांनी तर थेट कोविड सेंटरमधून काढता पाय घेतला. हे रुग्ण आपल्या नातेवाईकांसोबत दुचाकी तसेच मिळेल त्या वाहनावरून घरी निघून गेले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कोविड सेंटरमधील भोंगळ कारभाराबाबत तक्रार करताना काही रुग्णांनी सांगितले की, या सेंटरमध्ये रुग्णांना जेवण, पाणी, स्वच्छता यासारख्या मूलभूत सोयीसुविधा तर मिळतच नाही. परंतु, दररोज रुग्णांची आरोग्य तपासणी देखील केली जात नाही. मात्र, कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी करत नाही. रुग्णांच्या शरीराचे तापमान किती आहे, ऑक्सिजन पातळी व्यवस्थित आहे किंवा नाही, रुग्णांना गोळ्या-औषधे लागणार आहेत का? या प्रकारची कुठलीही तसदी घेतली जात नाही. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्ण सेंटरमध्ये दाखल होताना त्याला ज्या गोळ्या देण्यात आल्या आहेत, त्या व्यतिरिक्त नंतर कुणालाही गोळ्या व औषधे देण्यात आलेल्या नाहीत. आरोग्य तपासणी करा, असे सांगितल्यावर नर्स आणि डॉक्टर हे आमच्याकडे साधने नाहीत, असे बेजबाबदार उत्तर देत असल्याचीही तक्रार रुग्णांनी केली.

कोविड सेंटरमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले की, कोविड सेंटरमध्ये रुग्णांना व्यवस्थित उपचार व सोयीसुविधा दिल्या जात आहेत. परंतु, काही रुग्णांचे असे म्हणणे होते की, आम्हाला होम क्वारंटाईन करावे. मात्र, त्यांचा कोविड सेंटरमधील क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला नसल्याने आम्ही त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना कोरोनाच्या उपचार पद्धतीच्या नियमानुसार गोळ्या व औषधे दिले जात असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

पोलिसांनी रुग्णांना ताब्यात घेऊन कोविड सेंटरमध्ये आणावे, जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार

दरम्यान, १५ कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमधून निघून गेले आहेत. त्यांच्या बाबतीत आपण जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन परत कोविड सेंटरमध्ये आणावे, अशी विनंती पोलीस अधिकार्‍यांकडे केली आहे. असेही डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

प्रा. बी.एन.चौधरी यांना कुबेर पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कौटुंबिक वादातून विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

April 16, 2021

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आजपासून रंगणार !

August 22, 2024

जळगाव : भंगाळे गोल्डच्या कारागिराने १४ लाखांची केली फसवणूक ; शनिपेठ पोलिसात गुन्हा

June 6, 2022

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख !

October 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group