नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार करुन नराधमांनी तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या तीन नराधमांनी अल्पवयीन मुलीला जंगलात फरफटत नेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिचा गळा घोटून जीव घेतला. त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून त्यांनी तिचे डोके दगडाने ठेचले. मुलगी बराच वेळ घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी गावातील एका महिलेने जंगलातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला होता असे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या पित्याने तत्काळ जंगलाकडे धाव घेतली. तिथे त्यांना मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पंचनामा व गावकऱ्यांच्या साक्षीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला व या प्रकरणी गावातील तीन तरुणांना अटक केली.















