खरगोन (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका २२ वर्षीय युवकावर मृत्यू ओढावल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. इंदलसिंह जादव बंजारा, असे मयत तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यातील काटकुट गावात तो क्रिकेट खेळत होता.
गोलंदाजी करताना त्याला अचानक अस्वस्थ वाटले. त्याच्या छातीत दुखत होते. पहिल्यांदा त्याला पाणी पाजण्यात आले. त्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात भरती केले; परंतु येथील डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. अखेर बडवाह शासकीय रुग्णालयात इंदल सिंहला भरती केले. तिथे डॉ. विकास तलवार यांनी तपासणीअंती इंदलला मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने इंदलचा मृत्यू झाला. त्याला आमच्याकडे मृतावस्थेत भरती केले, अशी पुष्टी डॉक्टरांनी केली आहे.