नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात एका १७ वर्षीय तरुणीवर तब्बल २८ जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या अत्याचारमध्ये मुलीचे वडिलांसाहीत समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते. ललितपूर पोलीस ठाण्यात २८ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने आपला पती १० वर्षाच्या मुलावरही लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पीडित मुलगी आणि कुटुंबाला सुरक्षा दिली आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत १२ ऑक्टोबरला ललितपूर पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिने गेल्या पाच वर्षांपासून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला जात असल्याचा आरोप केला. जेव्हा आपण सहावीत होतो तेव्हा वडिलांनी जबरदस्ती पॉर्न व्हिडीओ दाखवत आपल्यावर बलात्कार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं.
यानंतर आरोपी पित्याने मुलीला शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेलं, जिथं तिच्यावर लोकांनी बलात्कार केला. वडिलांनी धमकावलं असल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नव्हती. यानंतर तिने आपल्या आईला सांगितलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपात २५ जणांचं नाव असून तीन अज्ञात आहेत.
दरम्यान, पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसंच दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. “आम्ही आतापर्यंत सात लोकांना अटक केली असून यामध्ये मुलीचे वडील आणि समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.