चोपडा (प्रतिनिधी) पहिल्या पत्नीला ६ अपत्य असतांनाही एका २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळेवेळी बलात्कार केला. धक्कादायक या पाच वर्षाच्या काळात पिडीतेने देखील तीन मुलांना जन्म दिला. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावातील तरुणीचे आधीच लग्न झालेले होते. पहिल्या पासून त्याला एक दोन नव्हे तब्बल सहा अपत्य होती. तरी देखील त्याने एका २९ वर्षीय तरुणीला २०१६ ते २०२१ पर्यंत वेळेवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे या पाच वर्षाच्या काळात पिडीतेला देखील ३ मुलं झालीत. आपली दिशाभूल करुन षडयंत्र, कटकारस्थान रचून हे सगळे केले गेल्याचा आरोप पिडीतेने फिर्यादीत केला आहे. एवढेच नव्हे तर घरातील इतर सदस्यांनी पिडीतेस घरातून माहेरी हाकलून देत तिची फसवणुक केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये चोपडा ग्रामीण रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अमरसिंग वसावे हे करीत आहेत.