भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात मजीद शहा हमीदशहा, रज्जाक शहा फत्तू शहा याच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ११ एप्रिल २०२२ रोजी मजीद शहा हमीदशहा (वय २१) याने तुझ्याशी काम आहे असे सांगुन पीडित अल्पवयीन मुलीला मोटार सायकलवर बसवुन वरणगाव बोदवड नागेश्वर मंदिराजवळ घेऊन गेला. तेथील रोडच्या बाजूस असलेल्या खड्यात नेवून रोडवर रज्जाक शहा फत्तू शहा (वय २५) आणि एकाला लक्ष देण्यास सांगुन मजिद याने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मजीदशहा, रज्जाकशहा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पुढील तपास सपोनिरी आशीष असराजी हे करीत आहेत.