बंगळुरू (वृत्तसंस्था) सुशांत सिंह राजपूतने ज्या पद्धतीने स्वतःच्या घरात फॅनला लटकून स्वतःला संपवलं, अगदी त्याच पद्धतीने आणखी एका अभिनेत्रीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. कन्नड बिग बॉस मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री जयश्री रामय्या हिच्या बाबतीतली ही धक्कादायक बातमी आहे. कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया सोमवारी दुपारी मृतावस्थेत सापडली. बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळला.
जयश्री रमैया हिने गेल्या वर्षी जूनमध्येच सोशल मीडियावर आपण आत्महत्या करणार असल्याचं लिहिलं होतं. त्यावर अनेक जण तिच्यापर्यंत पोहोचले. कानडी सुपरस्टारने तिला काम मिळवून देऊन मदत करण्याचंही सांगितलं आणि त्या वेळी टोकाच्या नैराश्यातून ती कशीबशी बाहेर पडली. जयश्रीवर मानसोपचार सुरू होते. पण ती नैराश्यातून पूर्ण बाहेर येऊ शकली नाही. कन्नड बिग बॉस च्या तिसऱ्या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती. तिच्याबरोबरच्या अनेक स्पर्धकांना या रिअॅलिटी शोनंतर कुठे ना कुठे काम मिळालं. पण जयश्री त्या बाबतीत खूश नव्हती. तिला अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नाही आणि त्यातूनच तिला नैराश्य आलं. त्याबद्दल तिने तिच्या मित्रमंडळींंना सांगितलं होतं. २४ जून २०२० रोजी या नैराश्यातूनच आपण आत्महत्या करणा असल्याचं तिने फेसबुक पेज वर लिहिलं. त्या वेळी कन्नड स्टार किचा सुदीप बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. पण ती या आजारातून अखेरपर्यंत बाहेर येऊ शकली नाही. सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचं, मेसेजला उत्तर देत नसल्याचं तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला. आश्रमाच्या लोकांनी तिच्या खोलीत प्रवेश केला, त्या वेळी ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. बंगळुरूच्या पोलीस ठाण्यात आत्महत्येसंदर्भात नोंद करण्यात आली आहे.
बिग बॉस कन्नडच्या तिसऱ्या सीझनमधून तिला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कन्नड चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. तिचे अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन जयश्रीला श्रद्धांजली वाहिली.