सोलापूर (वृत्तसंस्था) लग्नाचे आमिष दाखवत तरुणीला खाण्याच्या मसाला पानात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ नातेवाइकांमध्ये प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम गौतम शिंगे (रा. सोलापूर) असे संशयित आरोपी तरुणाचे नाव आहे.
संशयित आरोपी शुभम याने पीडित तरुणीला जुलै २०१२ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी नेले. याठिकाणी मसाला पानमध्ये गुंगीचे औषध देत नंतर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच जुलै ते सप्टेंबर २०२२ दरम्यान तरुणीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व व्हिडीओ दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, १५ ते १८ एप्रिलपर्यंत सर्व फोटो व व्हिडीओ पिडीतेच्या नातेवाइकांकडे पाठवण्याची धमकी देत दोन लाखांची मागणी केली, पण पीडितेने पैसे न दिल्याने आरोपीने ते व्हिडीओ व फोटो नातेवाईकांच्या मोबाइलवर पाठवून बदनामी केली. याप्रकरणी पीडित तरुणीने सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी शुभम शिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी करत आहेत.