जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरातील एमएसईबीच्या ऑफिससमोर कार चालकाला चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ६ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना रात्री अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, अमित बद्रीप्रसाद अग्रवाल (रा. अजिंठा सोसायटी, जळगाव) हे २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एमआयडीसी एम सेक्टरमधील एमएसईबीच्या ऑफिससमोर आपली कार (क्र एम एच – १९ सि एफ – ९२२५) ने जात होते. त्याचवेळी मागून सहा अज्ञात आरोपी हे बजाज पल्सर कंपनीची मो.सा (क्र एम एच – १९ बि.पी १९६९) व होंडा शाईन कंपनीची मो.सा. (क्र जी.जे.०५, के.वाय. ११९७ )वर येत कारला मागून धडक दिली आणि अपघात झाल्याचा बनाव केला. त्यानंतर या लुटारूंनी अमित अग्रवाल आणि त्यांचे वडील बद्रीप्रसाद अग्रवाल यांना मारहान करुन व चाकुचा धाक दाखवून खिशातील दोन मोबाईल, HDFC कंपनीचे डेबिट कार्ड, पॅनकार्ड क्रमांक असे काढून घेतले. एवढेच नव्हे तर चालकाचा मोबाईल आणि कारमधील २ लाख ४९ हजार ८०० रुपयाची रोकड बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पोबरा केला. याप्रकरणी अमित अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून ६ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमोल मोरे हे करीत आहेत.