पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात घराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत आपल्या मुलांसोबत खाटेवर झोपलेल्या महिलेवर एकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडली आहे. या प्रकरणी रवींद्र बाळू राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २० मे २०२२ रोजी पिडीत महिला आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत खाटेवर लहान मुलासोबत झोपलेली होती. रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास रविंद्र बाळु राठोड याने पिडीतेचे तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच जर याबाबत कोणास सांगीतले तर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी दिली. याप्रकरणी रविंद्र बाळु राठोड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ दिपक वाघ हे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी रविंद्र राठोडला पोलिसांनी अटक केली आहे.