तिरुवनंतरपुरम (वृत्तसंस्था) केरळ पोलिसांनी (Kerala Police) सेक्ससाठी भागीदारांची देवाणघेवाण करणाऱ्या रॅकेटशी संबंधित सात जणांना अटक केली आहे. यामध्ये तब्बल एक हजार जोडप्यांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामध्ये उच्चभ्रू वर्गातील लोकांचा देखील सहभागी आहे.
एका महिलेला तिचा पती इतर पुरुषांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भागत पाडत होता. त्यामुळे तिने करुकाचल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असून करुकाचल भागात अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीला अटक केली. त्याची चौकशी केली असता या रॅकेटचा भंडाफोड झाला.
सेक्सरॅकेटमध्ये एक गट सक्रीय असून ते सोशल मीडियाचा वापर करून हा धंदा करत असल्याचे उघडकीस आले. या ग्रुपने सोशल नेटवर्कींग साइट्सचा वापर करून राज्यभरात जाळे पसरवले आहे. सुरुवातीला ते टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील होतात. अशा प्रकारे ते एकमेकांशी जोडले जातात. यामागे एका मोठ्या ग्रुपचा हात असून याप्रकरणाशी संबंधित लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असं पोलिस अधिकारी श्रीकुमार यांनी सांगितले.
उच्चभ्रू वर्गातील लोकांचा समावेश
राज्यभरातील उच्चभ्रू वर्गातील लोक या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. सध्या २५ जण पोलिसांच्या रडारवर असून येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेले सर्व आरोपी आरोपी अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील आहेत. या रॅकेटच्या सोशल मीडिया ग्रुप्समध्ये १,००० हून अधिक सदस्य असल्याचा संशय पोलिसांना आहे.
















