चाळीसगाव (प्रतिनिधी) अपघाताचा बनाव करत सव्वा पाच लाखाचा तांदूळ विकला परस्पर विकल्याप्रकरणी कर्नाटकच्या व्यापाऱ्याने उस्मानाबाद ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, संतोष व्यंकटेश जक्का (वय ३२, रा. इस्लामपूरा वार्ड नं ८, गंगावती, जि. कोप्पल कर्नाटक) यांचा २५०.३० क्विंटल तांदूळ त्यात ५० किलोच्या ५०० बॅगा भरलेल्या ट्रक साहिबलाल शेख रसूल (रा. उमरगा जि. उस्मानाबाद) हा घेऊन जात होता. परंतू चालकाने हा ५ लाख २३ हजार ३७७ रुपये किंमतीचा तांदूळ परस्पर विक्री करून गाडीचे ब्रेक फेल झाल्याचा सांगत गाडीतून उडी मारून गाडी घाटात सोडून दिली. त्यानंतर अपघाताचा बनाव करून संतोष जक्क यांचा विश्वासघात केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात ट्रक चालक साहिबलाल शेख रसूलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहेत.