नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर-पश्चिम दिल्लीतील बुद्ध विहार फेज-1 भागातील एका जिममध्ये एका २१ वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका आरोपीच्या कारखान्यात काम करते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना गुरुवारी एका जिममध्ये घडली. या घटनेसंदर्भात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फॅक्टरी मालक उमेश आणि जिम मालक सुनील कुमार वत्स या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.