अकोल (वृत्तसंस्था) अकोला (Akola) जिल्ह्यात अक्षरशः अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका सराफा व्यापाऱ्याने पोलिसांनी त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी पीडित व्यावसियाकानं अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पण पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करून घेतला नाही.
९ जानेवारी रोजी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचं सोनं खरेदी केल्याप्रकरणी शेगावमधील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला अटक केली होती. आरोपी पोलिसांनी रात्री ३ वाजता सराफा व्यावसायिकाला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर शेगाववरून अकोला याठिकाणी येत असताना, पोलिसांनी संबंधित सराफाला गाडीतच प्रचंड मारहाण केली होती. त्यानंतर रविवारी न्यायालयाने संबंधित सराफाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
या दोन दिवसांच्या कालावधीत पोलीस निरीक्षक चव्हाण आणि पोलीस शिपाई कांबळे यानं बेदम मारहाण केली. हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी संबंधित सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी सराफाला जामीन मिळाल्यानंतर त्यानं घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला आहे. त्यानंतर पीडित व्यावसियाकानं अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्याद दाखल केल्यानंतर देखील पोलिसांकडून कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. अद्याप आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पण शहर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपावण्यात आली आहे. पोलीस कोठडीत बंद असलेल्या आरोपीवर पोलिसांनीचं अशा प्रकारे अनैसर्गिक अत्याचार केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.