नागपूर (वृत्तसंस्था) एका शाळेत शिक्षिका पदावर नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून विवाहित शिक्षिकेवर प्रियकराकडूनच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विवाहित शिक्षिकेचे वारंवार लैंगिक शोषण करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.. रोशन अशोक खोडे (३८, रा. नर्मदा कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय शिक्षिका आणि आरोपी रोशन खोडे हे बालपणातील मित्र असून, एकाच शाळेत शिकत होते. दरम्यान, तिचे लग्न झाले आणि तिला दोन मुले झाली. रोशन हा आरटीओ दलाल म्हणून काम करीत होता. दोन वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी महिला आरटीओ कार्यालयात गेली. तेथे तिला रोशन दिसला. त्याने तिला ड्रायव्हिंग लायसेनन्स काढण्यासाठी मदत केली.
नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून शारीरिक संबंधाची मागणी
रोशनने तिची विचारपूस केली असता आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याचे सांगितले. त्याने तिला आश्रम शाळेत नोकरीला लावून दिले. त्यामुळे तिचा संसार व्यवस्थित चालायला लागला. नोकरी लावून दिल्यामुळे दोघांचे घरी ये-जा वाढली. रोशनने तिला नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने मागणी फेटाळली. त्यानंतर त्याने नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने शारीरिक संबंधास होकार दिला. दोन-तीनदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही तो वारंवार शाळेतील नोकरी गमावण्याची धमकी देऊन बळजबरीने लॉजवर नेत होता. शेवटी तिने कंटाळून संबंधास नकार दिला.
पती-मुलाला मारण्याची धमकी
काही दिवसांनी रोशन खोडे हा पुन्हा शिक्षिकेच्या घरी आला आणि संबंधाची मागणी करू लागला. नकार देताच पतीला व मुलाला मारण्याची धमकी द्यायला लागला. बळजबरीने तिच्याशी संबंध प्रस्थापित करायला लागला. दोन दिवसांपूर्वी त्याने नकार दिला म्हणून बेदम मारहाण केली. त्यामुळे तिचा संयम सुटला आणि त्याच्या विरोधात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून रोशन यास अटक केली.