पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रवीण राजेंद्र सपकाळे (वय २१) याने नोव्हेंबर २०२२ पासून वेळोवेळी पिडीतेच्या आणि स्वतःच्या घरात जबरी अत्याचार केला. त्यानंतर दि. १६ रोजी पिडीतेच्या पोटात अचानक दुखत असल्याने सदर बाब आपल्या मोठ्या बहिणीला सांगितली. तेव्हा त्यांनी पिडीतेस अमळनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखवले असता, डॉक्टरांनी प्रेगन्सी टेस्ट केली असता ती पॉझीटीव्ह आली.
यानंतर पिडीतेला आई-वडील व बहीण यांनी सखोल विचारपुस केल्यावर पिडीतने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दरम्यान, प्रवीण सपकाळे याने वारंवार जबरी संभोग केला. तसेच धमकावून कोणाला सांगू नको. नाही तर तुझ्या लहान बहीणीला सुध्दा असच करेल अशी धमकी द्यायचा, असेही पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पोस्कोसह विविध कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोउनिरी राजु जाधव हे करीत आहेत.