पुणे (वृत्तसंस्था) आपल्या पोटच्या मुलासह विहिरीत उडी घेत महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या म्हातोबाची आळंदी येथे घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कविता भोसले असं या महिलेचं नाव असून वैयक्तिक कारणांमुळं दोन वर्षांच्या मुलासह आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता भोसले या मागील दोन दिवसांपासून आपल्या दोन वर्षांच्या मुलासह बेपत्ता होता. त्यांच्या नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात कविता बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी या दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले. पोलिसांनी महिलेच्या मोबाइलच्या शेवटच्या लोकेशनवरुन तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार हे लोकेशन आळंदी म्हतोबा या ठिकाणी दाखवत होते. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. पण दुर्दैवानं त्याआधीच तिचा मृतदेह विहरीत सापडला. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
















