पारोळा (प्रतिनिधी) शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचा घरात घुसून एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, २७ ऑगस्ट रोजी पिडीत विवाहिता घरी एकटी होती. पती शेतात तर मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शंकर विनायक ठाकुर याने पिडीत विवाहीतेकडे बघून हाताने ईशारे करुन त्याच्या घरात ये, असे सांगू लागला. पिडीत विवाहिता घाबरून घरात चालली गेली. त्यानंतर शंकर ठाकुर घरात जबरदस्ती घुसला आणि पिडीतेचा विनयभंग केला. पिडीतेने आरडा-ओरडा केल्यानंतर शंकर ठाकूर याने घटनास्थळावरून पळ काढला.
पिडीत विवाहितेने घरी आल्यावर पती व दीर यांना सदर घटना सांगितली. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर संशयित आरोपीतांनी पिडीतेचा पती व दिर यांना मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिली की, तुम्ही जर पोलीस स्टेशनला माझ्या विरुध्द तक्रार देण्यास गेले. तर तुमच्यावर माझ्या मुलीचे अपहरणाची व अँट्रासिटीची खोटी केस करेल. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपी ठाकूर हा नेहमी पिडीतेकडे बघून अश्लिल हावभाव करत असल्याचे देखील पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शंकर विनायक ठाकुरसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रविंद्र बागुल हे करीत आहेत.