निंभोरा (प्रतिनिधी) परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे एका महिलेवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन दिल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. १७ सप्टेंबर रोजी १४ वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलगी काड्या तोडीत असतांना नितीन मधुकर पाटील याने हा मोटार सायकलने आला. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीस तु माझ्या सोबत चल असे बोलत असतांना पिडीतेसोबत असलेल्या महिलेने सुद्धा त्याच्यासोबत जाण्यास सांगून प्रोत्साहन दिले. यानंतर संशयित आरोपी नितीन पाटील याने त्याच्या पेरूच्या मळ्यात पिडीतेवर बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविगायीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.