बारामती (वृत्तसंस्था) बारामती पोलिसांनी नुकताच मोठा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बारामती शहरात गणेश भाजी मार्केट मधील मंडई परिसरात हे सेक्स रॅकेट सुरू होते.
भाजी मंडई परिसरामध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती बारामती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी या माहितीची खातरजमा करून, पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी एक डमी ग्राहक पाठवला होता. डमी ग्राहकाबरोबर सौदा फिक्स झाल्यावर त्याने पोलिसांना इशारा केला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी महिला एंजटला अटक करण्यात केली आहे. तसेच २ महिलांची देखील सुटका करण्यात आली आहे. अटकेतील एजंट महिलेकडून रोख रक्कम आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे.