नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ग्रेटर नोएडामधील रोजा जलालपुरमधील एका तरुणाने दारु पिण्याच्या सवयीवरुन सतत टोमणे मारणाऱ्या आपल्या बहिणीची गोळी मारुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
नोएडा पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रोजा जलालपुरमधील सूरज नावाच्या या २२ वर्षीय तरुणीने त्याच्या रुचि नावाच्या ३२ वर्षीय बहिणीची गोळी मारुन हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरजला दारुचे व्यसन होतं. शुक्रवारी रात्री सूरज दारु पिऊन घरी आला तेव्हा त्याची बहिणी त्याला दारु पिण्याच्या या सवयीवरुन टोमणे मारु लागली. त्यामुळे संतापलेल्या सूरजने तिच्यावर पिस्तुलने गोळी झाडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या रुचिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुचिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार होता. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी सूरजचा फोटोही जारी केलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिसरख पोलिस स्थानकाच्या हद्दीतील ग्रेटर नोएडा पश्चिममधील जलालपुर गावामध्ये सूरज त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहत होता. सूरजच्या घरी त्यांच्या तीन बहिणी आणि दोन भाऊ तसेच आई वडील असे आठ जण रहायचे. सूरज हा इनव्हर्टर दुरुस्तीचं काम करायचा. मात्र त्याला दारुचं व्यसन लागलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३२ वर्षीय बहीण सुद्धा जलालपुर गावामध्ये तिच्या पतीसोबत राहत होती. दारु पिऊन घरी आलेला सूरज घरी येऊनही दारु पिऊ लागल्याने बहिणीने त्याला सुनावलं. मात्र संतापालेल्या सूरजने गोळी मारुन स्वत:च्या बहिणीची हत्या केली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबियांचा एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर बिसरख पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांच्या तपासामध्ये हे कुटुंब मूळचं हरदोईचं येथील आहे. आरोपी सूरज या पूर्वीही अनेकदा दारु पिण्याच्या कारणावरुन कुटुंबियांशी भाडलाय. दारु पिण्याच्या या सवीयमुळे तू आपलं घर आणि कुटुंब उद्धवस्त करतोय असं ती सूरजला समजावून सांगायची. अनेकदा याच विषयावरुन या दोघांचे वाद व्हायचे. अशाच एका वादातून ही घटना घडली असून पोलीस आता सूरजचा शोध घेतायत.