गडचिरोली (वृत्तसंस्था) धानपिकात रासायनिक खत मारत असताना शेतकरी शेतात दगावल्याची घटना चोप येथे मंगळवारी (२२ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे देसाईगंज तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मोरेश्वर मारोती मुंडले १ (वय ५२) रा. चोप असे मृत्यू शेतकऱ्याचे नाव आहे.
मोरेश्वर मुंडले हे सकाळच्या सुमारास शेतावर जाऊन धानपिकात रासायनिक खत मारणे सुरू केले. काही वेळात ते शेतात मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज आणण्यात आले. मोरेश्वर मुंडले यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा व दोन विवाहित मुली असा आप्तपरिवार आहे.