सोलापूर (वृत्तसंस्था) एका तरुण पत्रकाराने हाताची नस कापून घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश जाधव (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. प्रकाश हा सोलापूर शहरातील सुशीलनगरमध्ये राहत होता. पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याने सकाळ, सोलापूर तरुण भारत आणि सुराज्य दैनिकात काम केले होते. सध्या तो घरीच होता. दोन दिवसांपूर्वी वडील कोरोनाचे बळी ठरले. पोलीस असलेला भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आला. आई कोरोनावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी प्रकाशने अनेक फेऱ्या मारल्या. मात्र, हे इंजेक्शन त्याला मिळाले नव्हते. प्रकाश सध्या होम क्वारंटाइन होता. क्वारंटाइन असताना घरीच त्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.