चाळीसगाव (प्रतिनिधी) शाळेतील शिक्षिकेचा शाळेतीलच पर्यवेक्षकाने विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका शिक्षिकेच्या विनयभंग प्रकरणी पर्यवेक्षकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. विठ्ठल अंबादास शिंगाडे असे या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शिक्षिकेचा पाठलाग करणे, फोनवरून अश्लिल संभाषण करणे. तसेच याबाबत मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार केल्यावर पिडीत शिक्षिकेच्या नातेवाईकांना धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पर्यवेक्षक विठ्ठल अंबादास शिंगाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे करीत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रयत सेना व करणी सेनेच्या वतीने संस्था चालकांना नोटीस देण्यात आली होती.
















