दौसा (वृत्तसंस्था) राजस्थानच्या दौसा येथे चांदसेन गावात महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (Crime) नोंद केला आहे. आरोपी महिला आणि प्रियकराला अटक केली आहे. महिलेचा प्रियकर नात्याने काका असूनही दोघांचे अनैतिक संबंध सुरू होते. त्यामुळे दोघांनी हत्येचा कट रचला.
मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाआधी ओम प्रकाश गुर्जर आणि रेशंता यांचा विवाह झाला होता. तरीही रेशंताचे दुसऱ्या गावात राहणाऱ्या धर्मवीरसोबत अनैतिक संबंध होते. धर्मवीर हा रेशंताचा नात्याने दूरचा काका लागत होता. नात्याने काका असूनही दोघांचे अनैतिक संबंध सुरू होते. त्यामुळे दोघांनी पती ओम प्रकाश गुर्जरच्या हत्येचा कट रचला. रेशंताने झोपेच्या गोळ्या मागविल्या. त्यानंतर तिनं पतीच्या रात्रीच्या जेवणात १० गोळ्या टाकल्या. त्यानंतर रेशंताच्या पतीला गाढ झोप लागली. पती झोपी जाताच तिनं प्रियकराला बोलावून घेतले.
पत्नी रेशंतानं प्रियकराला बोलावून त्याचा हातात कुऱ्हाड सोपावली. त्या कुऱ्हाडीने रेशंताच्या पतीची हत्या केली. आरोपी धर्मवीरने त्यांच्या लग्नाच्या पहिला वाढदिवसालाच कुऱ्हाडीनं दोन वेळा हल्ला करत रेशंताच्या पतीची हत्या केली. त्यानंतर दोघेही दुचाकीनं फरार झाले. सकाळी नातेवाईक ओम प्रकाश गुर्जरला उठवायला आले, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी हजर झाले. सदर हत्येप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद केला. अवघ्या १२ तासांच्या आत आरोपी महिला आणि आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या.