दिल्ली (वृत्तसंस्था) एका आईने मुलांमुळे आपलं जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय महिलेने (50 Year Old Women) एका नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ख्याला भागातील ५० वर्षीय महिलेने नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागे तणावाचं कारण समोर आलं आहे, महिलेला दोन मुलं आहेत. मात्र दोघेही बेरोजगार आहेत. इतकच नाही तर दोघांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणं होत होती. यामुळे दररोजच्या भांडणाला वैतागून महिलेने आत्महत्या केली. मृत महिलेचं नाव निर्मला आहे. ती शिवणकाम करून घर चालवित होती. मात्र तिची मुलं काहीच काम करीत नव्हते. त्यामुळे घरात आर्थिक चणचण होती. यामुळे महिला मानसिकदृष्ट्या तणावात होती. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता निर्मला यांनी नाल्यात उडी मारून आत्महत्या केली.