TheClearNews.Com
Monday, March 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! आईनेच प्रियकराच्या मदतीने काढला मुलाचा काटा ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

कबुतराचा पिंजरा घेऊन देण्यासाठी मध्य प्रदेशात नेऊन चिमुरड्याची केली हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जलाराम नगरातील १४ वर्षीय विद्यार्थी गेल्या दि.१६ जानेवारीपासून बेपत्ता होता. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली असून मयत मुलाच्या आईचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधात अडसर ठरत असल्याने आईनेच प्रियकराच्या मदतीने मुलाचा काटा दूर काढला. दरम्यान, महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकून कोठडीत रवाना केले आहे.

यासंदर्भात अधिक असे की, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईनेच मित्राच्या मदतीने जंगलात गळफास देवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय-१४ रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. तर त्यांची आई मंगलाबाई विलास पाटील (वय ३५) आणि प्रमोद जयदेव शिंपी (वय-३८ रा. विखरण ता. एरंडोल) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.

READ ALSO

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

बालक रविवारपासून होता बेपत्ता

याबाबत फिर्यादीत नमूद केल्यानुसार विलास नामदेव पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि मुलगा प्रशांत पाटील यांच्यासह जलाराम नगरात वास्तव्याला आहेत. विलास पाटील हे खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, त्यांची पत्नी मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून सूत जमले होते. पुरुषोत्तम ऊर्फ प्रशांत पाटील आई-वडिलांसह वास्तव्यास असून, नववीचे शिक्षण घेत होता. ऑनलाइन वर्ग सुरू असून, रविवारी (ता. १६) सुटीचा दिवस असल्याने तो, घरातून बेपत्ता झाला. वडील विलास पाटलांसह नातेवाईक कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतरही तो, मिळून न आल्याने या प्रकरणी तालुका पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर संशयिताने तोंड उघडले

दाखल गुन्ह्याच्या तपासात कुठलीच माहिती कशी समोर येत नाही, म्हणून पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर, भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने या मुलाच्या शोधात जंगजंग पछाडूनही माहिती हाती लागलीच नाही. गुप्त बातमीदाराने शंका उपस्थित केल्यावर अखेर तांत्रिक माहितीचा आधार घेतल्यावर प्रशांत बेपत्ता झाल्यापासून ते आज अखेर त्याच्या कुटुंबीयांशी जवळीक असलेल्या व्यक्तींवर संशय बळावला होता. त्यातूनच एकाला ताब्यात घेण्यात आले. सोमवारची रात्र आणि मंगळवारचा दिवस असा तालुका पोलिसांत पाहुणचार घेतल्यानंतर संशयिताने तोंड उघडले. पोलिसांचे पथक प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संशयिताला घेऊन मध्य प्रदेशाच्या दिशेने रवाना झाले. पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.

 

कबुतरांच्या छंदापायी चिमुरडा जाळ्यात

तपासी पथकाच्या पाहुणचारात अटकेतील भामट्याने पुरुषोत्तम ऊर्फ प्रशांत पाटील याला त्याच्या आईच्या मित्राने, ‘तुला कबुतरांचा मोठा पिंजरा घेऊन देतो’ असे सांगत गोड बोलून मध्य प्रदेशात घेऊन गेला. निर्मनुष्य जंगलात नेऊन या बालकाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली आहे. २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघांना अटक केली. पोलीसांनी बर्‍हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला.

 

१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, मुलाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना गुरूवार २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर, भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने परिश्रम घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

February 28, 2026
Next Post

जे दंगलीची भाषा करताहेत त्यांनी दंगल करूनच दाखवा, इथे ठाकरे सरकार आहे : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2025

February 27, 2025

समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये : डॉ. भालचंद्र नेमाडे

December 14, 2022

फायरब्रॅड नेत्या प्रतिभाताई शिंदे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश ; राहुल गांधींनी केले स्वागत !

December 20, 2023

खाजगी बँकेची कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक ; अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

August 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group