नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील गोकुळपुरी पोलिस स्टेशनमध्ये एका सुनेने सासरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ८ वर्षांपासून सासरा तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर पहिल्या घटनेनंतरच तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती पतीला दिली तर त्याने पत्नीलाच धमकावले. आरोपीने एकदा पत्नी आणि दोन्ही मुलांसमोर बलात्कार केला होता.
या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २७ वर्षीय महिला गेल्या दीड महिन्यापासून गोकुळपूरी भागात आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे. २०१३ मध्ये तिचं लग्न उत्तर प्रदेशातील एका तरुणासोबत झालं होतं. लग्नाच्या दोन महिन्यांपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र यानंतर तिच्या पतीने तिला मारहाण सुरू केली. यादरम्यान महिलेचा गर्भपातदेखील झाला होता.
आरोप आहे की, एक महिन्यानंतर तिच्या सासऱ्याने नशेच्या औषधाचा वास देऊन तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेचे वकील विजय गोस्वामी यांनी सांगितलं की, आरोपीने आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर हे घृणास्पद कृत्य केलं. यानंतर तिचा पती दोन्ही मुलांना घेऊन गावी निघून गेला आणि त्यांना तिथच सोडलं. महिलेने या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.