पिंपरी (वृत्तसंस्था) तरुणाने अल्पवयीन मुलीला चॉकलेट खायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. मुळशी तालुक्यातील माण येथे हा प्रकार घडला. ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू (वय १९, रा. माण, ता. मुळशी, मूळ रा. उडीसा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसानिमित्त आरोपी चॉकलेट घेऊन आला. त्यानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीचे आईवडील व भाऊ हे कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळी आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या लहान भावाला चॉकलेट खाण्यास दिले. चॉकलेट खाल्ल्यावर पीडित मुलगी ही झोपी गेल्यावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. ही बाब तिच्या घरच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू (वय १९, रा. माण, ता. मुळशी, मूळ रा. उडीसा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.