बीड (वृत्तसंस्था) येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तीन जणांनी ५० हजारांसाठी (50 thousand grant) आपण तिचा पती असल्याचा दावा ठोकला आहे. एकाच महिलेचा पती म्हणून तीन जणांनी केलेला अर्ज पाहून प्रशासनानेही डोक्याला हात लावला आहे.
एकाच महिलेचा पती म्हणून तीन जणांनी केलेले अर्ज पाहून प्रशासनाला देखील धक्का बसला आहे. नावातील फरक आणि नाते जुळत नसल्याच्या कारणामुळे प्रशासनाने हे अर्ज नाकारले आहेत. पण ५० हजार रुपये मिळवण्यासाठी तिघांनी केलेला कांड पाहून प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे कागदपत्रांची कसून छननी सुरू आहेत. सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केल्यानंतरच अर्ज स्वीकारले जात आहेत.
आतापर्यंत बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २ हजार ९६८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशात शासनाने मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. हे अनुदान मिळणवण्यासाठी आतापर्यंत ३ हजार ३२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २ हजार ११७ अर्ज बरोबर असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. संबंधितांना अनुदान मंजूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.