धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी घडली. शितल संतोष पाटील (वय 34), असे मयत विवाहितेचे नाव आहे.
वाडी भोकर जिल्हा धुळे येथील माहेरवाशी असलेल्या शितल पाटील या विवाहितेचा सासरच्यांनी सन 2013 पासून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करत होते. या जाचाला कंटाळून तिने अनोरे येथील संतोष दगा चौधरी यांच्या शेत गट नंबर 302 मध्ये असलेल्या विहिरीत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली.
या प्रकरणी कौतिक भिवसन पाटील यांच्या फिर्यादीवरून पती संतोष हिरामण पाटील, सासू राजपुरबाई हिरामण पाटील ,सासरे हिरामण अभिमन पाटील यांच्या विरुद्ध गुरन 121/20024 कलम 308, 498 (अ), 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद करीम करीत हे आहेत. दरम्यान, मयत विवाहितेचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी संतप्त माहेरच्या लोकांनी पती संतोष याला चांगलाच चोप दिला. यावेळी काहींनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला.